बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या न्यायव्यवस्थेबद्दलच्या अलीकडच्या वक्तव्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये दोघांनाही पदावरून हटवण्याची मागणी केली होती. याचिकेमध्ये म्हटले होते की, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या बेजबाबदार विधानांनी सार्वजनिकरित्या सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा कमी केली आहे. आता ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

याबाबत उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हता गगनाला भिडली आहे. एखाद्या व्यक्तीच्या विधानाने ती नष्ट होऊ शकत नाही किंवा प्रभावित होऊ शकत नाही.’ अशाप्रकारे हाय कोर्टाने जगदीप धनखर आणि किरेन रिजिजू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)