तेलंगणातील मेडक जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण ठार झाले. पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग लागून सहा वर्षांची मुलगी आणि तिची 60 वर्षीय आजी यांचा मृत्यू झाला. मेडक जिल्ह्यातील चिन्ना शिवनूर गावात ही घटना घडली. अनूक्रमे मधू आणि अंजम्मा अशी मृतांची नावे आहेत. स्फोट झाल्याने आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये दोन मुलांसोबत राहणारी अंजम्मा मंगळवारी रेशन दुकानातून तांदूळ घेण्यासाठी आणि मासिक पेन्शन घेण्यासाठी तिच्या नातवासोबत गावी आली होती.
A six-year-old girl and her 60-year-old grandmother were killed in a cooking gas cylinder explosion in #Telangana's Medak district late on Tuesday night, police said on Wednesday. pic.twitter.com/fJ95BO1T2v
— IANS (@ians_india) January 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)