कथित दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि तमिळनाडूमधील बिहारी लोकांवरील हल्ल्याचे व्हिडिओ पोस्ट केल्याच्या आरोप असलेल्या YouTuber मनीष कश्यपने (Manish Kashyap) शनिवारी बेतिया येथील जगदीशपूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मनीष कश्यपच्या अटकेबाबत EOU टीम सतत त्याचा शोध घेत होती. या संदर्भात EOUचे एसपी सुशील कुमार यांनी सांगितले की, पोलिसांचे छापे आणि शोध मोहीम सुरू असताना मनीषने आत्मसमर्पण केले. मनीष कश्यपने आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
पहा ट्विट -
तमिलनाडु में कामकाजी बिहार के निवासियों के लिए असत्य, भ्रामक एवं उन्माद फ़ैलाने वाले वीडियो को प्रसारित करने एवं आर्थिक अपराध थाना कांड सं0 3/23 तथा 4/23 के अभियुक्त मनीष कश्यप ने बिहार पुलिस एवं EOU के दबिश के कारण बेतिया के जगदीशपुर थाने में किया आत्मसमर्पण।#BiharPolice
— Bihar Police (@bihar_police) March 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)