अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनी तालिबानने मंगळवारी 'अंतरिम' सरकारची घोषणा केली. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे या सरकारचे प्रमुख असतील. त्याचबरोबर अब्दुल गनी बरदार यांना उपप्रमुख नियुक्त करण्यात आले आहे. मुल्ला याकूब संरक्षण मंत्री आणि सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री असतील. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की ही तात्पुरती व्यवस्था आहे. पुढे, संपूर्ण सरकार बनवण्याच्या योजनेवर काम केले जाईल. तोपर्यंत मुल्ला हबीबुल्ला अखुंदजादा मंत्रिमंडळाचे पालक असतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)