Swiggy Lay Off: आयपीओच्या शर्यतीत असलेल्या फूड अँड ग्रोसरी डिलिव्हरी फर्म स्विगीने पुन्हा एकदा टाळेबंदी सुरू केली आहे. कंपनीला टाळेबंदीच्या माध्यमातून आपला खर्च कमी करायचा आहे जेणेकरून कंपनीचा नफा वाढेल. सूत्रांनी सांगितले की, स्विगी आपल्या कर्मचार्‍यांच्या संख्येत 6% कपात करण्यास तयार आहे, ज्यामुळे तंत्रज्ञान, कॉल सेंटर आणि कॉर्पोरेट रोल्समधील 350 ते 400 कर्मचारी प्रभावित होतील. येत्या आठवडाभरात ही नोकर कपातीची कारवाई हळूहळू केली जाईल. स्विगीचा फूड डिलिव्हरी व्यवसाय नफा कमवत आहे, परंतु त्याचे किराणा युनिट इन्स्टामार्ट अजूनही तोट्यात आहे. कंपनीची नोकर कपातीची ही दुसरी फेरी आहे. यापूर्वी कंपनीने जानेवारी 2023 मध्ये 380 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. यासोबतच खर्च कमी करण्यासाठी त्यांनी मीट मार्केटप्लेस बंद केला होता. (हेही वाचा: Share Market Holiday: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठे अपडेट! पुढील सलग 3 दिवस बाजार बंद राहणार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)