देशातील एक मोठे औद्योगिक घराणे समजल्या जाणाऱ्या सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे निधन झाले आहे. रॉय यांच्या निधनामुळे उद्योगजगतात शोककळा पसरली आहे. सहारा प्रमुखांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजारी असून त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुधीर चंद्र रॉय आणि आईचे नाव छवी रॉय होते. सुरुवातीचे शिक्षण कोलकाता येथे घेतल्यानंतर त्यांनी गोरखपूर येथील सरकारी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. सुब्रत रॉय यांनी आपला पहिला व्यवसाय गोरखपूरमधूनच सुरू केला. (हेही वाचा: Jayant Patil Tests Positive for Dengue: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण; सोशल मिडियावर रिपोर्ट शेअर करत दिली माहिती)
BREAKING: Subrata Roy, chairman of the Sahara Group, passes away aged 75 in Mumbai pic.twitter.com/RMiiiCuRpi
— Shiv Aroor (@ShivAroor) November 14, 2023
सहारा ग्रुप के प्रमुख सुब्रत रॉय का निधन
◆ पार्थिव शरीर बुधवार को लखनऊ के सहारा शहर लाया जाएगा
◆ सुब्रत रॉय काफी दिनों से गंभीर बीमारी से ग्रसित थे #SubrataRoy #ChiefOfSahara | Sahara Group Chief Subrata Roy pic.twitter.com/i6YfAYB3GG
— News24 (@news24tvchannel) November 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)