आंध्र प्रदेशमध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. विशाखापट्टणममध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. 15 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. देखभालीदरम्यान हा अपघात झाला. डीआरएमच्या म्हणण्यानुसार, विशाखापट्टणममधील कांचरापलेमजवळ वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याची विंडशील्ड खराब झाली आहे.

आता पोलिसांनी सांगितले की, नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर कथित दगडफेकीच्या घटनेप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. गोशाळा शंकर (22), ताकेती चंदू आणि पेद्ददा राज कुमार (19) अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. विशाखापट्टणममधील कांचरापलेम भागात रेल्वे लेव्हल क्रॉसिंगजवळील अंडरपासवरून त्यांना पकडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी वंदे भारत एक्सप्रेस गाडी शहरात दाखल झाली. भाजपच्या अधिकाऱ्याने त्याच्या हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये तीन लोक वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करताना दिसत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)