भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आज (4 जून) आज मोठ्या प्रमाणावर कोसळला. बाजार सुरु झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स (Sensex) 2,700 अंकांनी घसरून 73,844 वर आला आणि एनएसई निफ्टी (Nifty) 769 अंकांनी घसरून 22,494 वर आला. भारतीय सार्वत्रिक निवडणूक निकाल (General Election Result 2024) जाहीर होत आहेत. शेअर बाजारात पडझड कायम असल्याचं पहायला मिळालं आहे. Sensex 5000 पेक्षा अधिक अंकांनी खाली आला असून सध्या तो 71,206.66 वर आहे. आज लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील ही पडझड बघायला मिळाली आहे.
पाहा पोस्ट -
‼️ Markets ‼️ 📉#SENSEX #Nifty #ElectionsResults#BJP pic.twitter.com/paFIYvQnRP
— Udbhav Goel (@udbhavgoel) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)