राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहेत. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होईल. तर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
Tweet
➡️राज्यातल्या पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्हयांमधल्या ९२ नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.
➡️येत्या १८ ऑगस्टला मतदान होणार; १९ऑेगस्टला मतमोजणी. #maharashtra #CityCouncilElection @DDNewslive @DDNewsHindi @CEO_Maharashtra pic.twitter.com/9Kb5K0dE7s
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)