गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) हत्याकांड प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला भारतात आणण्यात आलं आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात सामील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा व्यक्ती सचिन थापन बिश्नोई (Sachin Bishnoi) याला भारतात आणण्यात आलं आहे. सचिनला अझरबैजान येथे अटक करण्यात आली होती, त्यानंतर आता त्याला भारतात आणण्यात आलं आहे. सचिन थापनने दुबईमध्ये बसून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)