अयोद्धेमध्ये 22 जानेवारीला रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजाविधींना सुरूवात झाली आहे. रामभक्तांची उत्सुकता देखील शिगेला पोहचली आहे. अशात आता खास मान्यवरांना आमंत्रण पोहचवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रण देण्यात आले मात्र त्यांनीही 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आपण येणार असल्याची माहिती पत्राद्वारा दिली आहे. श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीसांना त्यांनी पत्र लिहलं आहे. 22 जानेवारी नंतर थोडा वेळ काढून शांतपणे आपण दर्शनाला येऊ तो पर्यंत मंदिराचे कामही झालेले असेल असे ते म्हणाले आहेत. Rahul Gandhi On Ram Mandir: काँग्रेसचे लोकही राम मंदिरात जाऊ शकतात, पण मी...', 22 जानेवारीच्या राम मंदिर लोकार्पण, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर पहा राहुल गांधींची प्रतिक्रिया.
पहा ट्वीट
NCP chief Sharad Pawar receives an invitation to attend the pran pratishtha ceremony of Ram Temple in Ayodhya. Sharad Pawar wrote a letter to General Secretary of Ram Janmabhoomi Teerth Kshetra Champat Rai.
The letter reads, "After the pran pratistha ceremony is completed on… pic.twitter.com/XeYmrctqq4
— ANI (@ANI) January 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)