राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा पूजेच्या विधींना आजपासून सुरूवात होत आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा (Ram Temple Pran Pratishtha Ceremony) संपन्न होणार आहे. यासाठी देण्यात आलेलं आमंत्रण कॉंग्रेसच्या नेत्यांनी नाकारलं आहे. पण आज राहुल गांधींनी (Rahul Gandhi) हे आमंत्रण नाकारण्यामागील कारण बोलून दाखवलं आहे. '22 जानेवारीचा कार्यक्रम पॉलिटिकल इव्हेंट आहे. आम्ही सार्या धर्मीयांचा आदर करतो. आम्हांला कोणत्याही धर्माचा फायदा घ्यायचा नाही. मला त्यामध्ये इंटरेस्ट नाही. माझा धर्म मला माझ्या शर्ट वर लिहण्याची गरज नाही.' असं ते म्हणाले आहेत.
राहुल गांधी सध्या नागालॅंडच्या कोहिमा मध्ये आहेत. तेथे बोलताना त्यांनी 'राम मंदिरात ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात. कॉंग्रेसची लोकं देखील जाऊ शकतात. मात्र आम्ही राजनैतिक इव्हेंट मध्ये जाऊ इच्छित नाही. मी यात्रेमध्ये आहे. अयोद्धा माझ्या न्याय यात्रा मध्ये येत नाही. मी धर्माच्या सिद्धांतावर आपल्या आयुष्याला जगायला पाहात आहोत. लोकांसोबत चांगले वागतो त्यांची इज्जत करतो.' असेही ते म्हणाले आहेत. Inauguration of Ayodhya Ram Mandir: कॉंग्रेस कडून Mallikarjun Kharge, Sonia Gandhi, Adhir Ranjan Chowdhury अयोद्धा राम मंदिर उद्धाटनाला राहणार अनुपस्थित!
पहा राहुल गांधींची प्रतिक्रिया
#WATCH | On Ram Temple Pran Pratishtha ceremony, Congress MP Rahul Gandhi says, "The RSS and the BJP have made the 22nd January function a completely political Narendra Modi function. It's a RSS BJP function and I think that is why the Congress President said that he would not go… pic.twitter.com/FOCwvm1FBp
— ANI (@ANI) January 16, 2024
राहुल गांधी यांनी आपण 'इंडिया' सोबत भाजपाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असं म्हणाले. सीट शेअरिंग वर सध्या चर्चा सुरू असून यामध्ये कोणती समस्या नसेल यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे काही राज्यात सीट शेअरिंग वरून गोष्टी अडकल्याचे संकेत दिले आहेत.
राहुल यांनी नागालँडच्या जनतेलाही संबोधित केले. ते म्हणाले की, येथील लोक छोट्या राज्यात राहतात. पण त्यांनी स्वतःला देशातील इतर लोकांच्या बरोबरीचे वाटले पाहिजे. भारत जोडो न्याय यात्रेवर बोलताना राहुल म्हणाले की या मोर्चाचा उद्देश 'लोकांना न्याय देणे आणि राजकारण, समाज आणि आर्थिक संरचना सर्वांना समान आणि सुलभ करणे हा आहे.