एका अल्पवयीन मुलीच्या कस्टडीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय देत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले की, पालकांपैकी कोणाही एकाचा ताबा मुलाच्या कल्याणाला चालना देत नसेल, तर मुल तिसऱ्या व्यक्तीकडे सोपवले जाऊ शकते. अशाप्रकारे न्यायालयाने एका 9 वर्षांच्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने या मुलीचा ताबा तिच्या आजीकडे सोपवला आहे. मुलीच्या कस्टडीबाबत तिची आई आणि आजीमध्ये कायदेशीर लढाई चालू होती. प्रकरणाबाबत न्यायमूर्ती मंजरी नेहरू कौल म्हणाल्या, मुलीची आई ही तिची नैसर्गिक पालक आहे यात शंका नाही, परंतु ती केवळ तिच्या कायदेशीर अधिकाराच्या बळावर मुलीचा ताबा घेऊ शकत नाही. मुलीचे हीत तिच्या आईपेक्षा तिची आजी जास्त चांगल्या प्रकारे पाहू शकते म्हणून न्यायालयाने या 9 वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या आजीकडे सोपवला.

आजीने केलेल्या आरोपानुसार मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केले होते. मात्र मुलीची आई या अत्याचारांपासून तिची रक्षण करू शकली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)