Sensex Record High: शुक्रवारी दुपारच्या व्यवहारात शेअर बाजाराने सुमारे 872 अंकांच्या वाढीसह 72600 चा स्तर ओलांडला होता. निफ्टी आणि सेन्सेक्स आज ताज्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. यावेळी निफ्टीने 200 अंकांच्या वाढीसह 22000 चा स्तर गाठला होता. गुरुवारी टीसीएस आणि इन्फोसिसच्या निकालानंतर शुक्रवारी आयटी शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी हे शेअर बाजारातील वाढीचे मुख्य कारण होते. आशियाई बाजारांमध्ये टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग उच्च पातळीवर व्यवहार करत होते. (हेही वाचा: Infosys Profit Figure: इन्फोसिसचा नफा 7% ने घटून 6,106 कोटी रुपये झाला; कंपनीने जाहीर केले आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल)
#Sensex #Nifty #Markets pic.twitter.com/Or8kuiM6RF
— NDTV (@ndtv) January 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)