Close
Search

Infosys Profit Figure: इन्फोसिसचा नफा 7% ने घटून 6,106 कोटी रुपये झाला; कंपनीने जाहीर केले आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल

वित्तीय सेवांमध्ये स्थिर चलनाच्या बाबतीत सुमारे 6% ची वार्षिक घसरण झाली आहे. कंपनीच्या एकूण महसुलात त्याची मोठी भूमिका असते.

Socially टीम लेटेस्टली|

Infosys Profit Figure: आयटी क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत इन्फोसिसचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 7% ने घटून 6106 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6,586 कोटी रुपये होता. तिसर्‍या तिमाहीत परिचालन महसूल 1% ने वाढून रु. 38,821 कोटी झाला, मागील वर्षी याच तिमाहीत रु. 38,318 कोटी होता. वित्तीय सेवांमध्ये स्थिर चलनाच्या बाबतीत सुमारे 6% ची वार्षिक घसरण झाली आहे. कंपनीच्याly%2Ftechnology%2Finfosys-profit-figure-infosys-profit-down-7-to-rs-6106-crore-the-company-announced-the-results-for-the-third-quarter-of-the-financial-year-2024-519565.html&t=Infosys+Profit+Figure%3A+%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BE+7%25+%E0%A4%A8%E0%A5%87+%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A8+6%2C106+%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80+%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87+%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%3B+%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87+%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0+%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87+%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95+%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7+2024+%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87+%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2', 900, 500);" href="javascript:void(0);">

Socially टीम लेटेस्टली|

Infosys Profit Figure: आयटी क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत इन्फोसिसचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 7% ने घटून 6106 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6,586 कोटी रुपये होता. तिसर्‍या तिमाहीत परिचालन महसूल 1% ने वाढून रु. 38,821 कोटी झाला, मागील वर्षी याच तिमाहीत रु. 38,318 कोटी होता. वित्तीय सेवांमध्ये स्थिर चलनाच्या बाबतीत सुमारे 6% ची वार्षिक घसरण झाली आहे. कंपनीच्या एकूण महसुलात त्याची मोठी भूमिका असते. तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसचा एट्रिशन रेट 14.6% वरून 12.9% (QoQ) पर्यंत घसरला. निकाल जाहीर होण्यापूर्वीच इन्फोसिसच्या शेअर्सवर दबाव दिसून आला. आजचा व्यवहार संपल्यानंतर इन्फोसिसच्या शेअरची किंमत 1.69 टक्क्यांनी घसरून 1,494.20 रुपयांवर आली.

दुसरीकडे, देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने तिसऱ्या तिमाहीत नफ्यात वाढ नोंदवली आहे. टीसीएसने गुरुवारी आपले आर्थिक निकाल जाहीर केले. टीसीएसने जानेवारीच्या तिमाहीत 11,058 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 2 टक्के अधिक आहे. या कालावधीत, कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 4 टक्के वाढ झाली आहे, जी बाजाराच्या अंदाजापेक्षा चांगली आहे. (हेही वाचा: Amazon Prime Layoffs: अॅमेझॉनने केली नोकर कपातीची घोषणा; प्राइम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओ व्यवसायातील शेकडो लोकांना काढून टाकणार)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change