Independence Day 2023: स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. यासोबतच राष्ट्रीय राजधानीत सुरक्षा व्यवस्थेबाबत कडक पावले उचलली जात आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही अनुचित घटनेला तोंड देण्यासाठी राजघाट, आयटीओ आणि लाल किल्ल्याभोवती अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे. एवढेच नाही तर दिल्लीच्या सीमावर्ती भागातून प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणीही पोलिसांकडून केली जात आहे.
दुसरीकडे, पोलीस उपायुक्त (मध्य) यांनी ट्विट करून माहिती दिली की, 'स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर राजघाट, आयटीओ आणि लाल किल्ल्याभोवतीच्या सर्व भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे. तसेच, या भागात कोणत्याही मेळाव्यास परवानगी नाही. यावेळी 15 ऑगस्ट रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Delhi: Security tightened ahead of Independence Day celebrations in the National Capital.
(Visuals from ITO) pic.twitter.com/xlx15bvwpg
— ANI (@ANI) August 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)