जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रिसल चिन्निगाम भागात लष्कराच्या जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवानही शहीद झाला. जिल्ह्यात फ्रिसल चिन्निगम आणि मुदरगाम या दोन ठिकाणी चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख ही कारवाई संपल्यानंतरच कळणार आहे. विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. काश्मीर झोन पोलिसांनी 'X' वर या चकमकीची पुष्टी करताना पोलीस आणि सुरक्षा दल कारवाई करत असल्याचे लिहिले आहे. अधिक तपशील नंतर सामायिक केले जातील.  (हेही वाचा - Encounter In Kulgam: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; एक जवान शहीद)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)