Reels Impact on Sales In India: सोशल मीडियाचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. लोक त्यांच्या रोजच्या दिवसातील बराचसा वेळ सोशल मिडियावर व्यतीत करत असतात. याच्याशीच निगडीत भारतात उत्पादन खरेदी करण्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. मेटाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील पाहून लो मोठ्या प्रमाणावर उत्पादने खरेदी करत आहेत. मेटाने मंगळवारी #MadeonReels लाँच केल्याची घोषणा केली. रील्स जाहिरातींचे जर सामर्थ्य आहे ते देशातील ब्रँडपर्यंत नेण्यासाठी हा कार्यक्रम डिझाइन केलेला आहे.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट रीलमधील मनोरंजक कथाकथनाद्वारे ब्रँड्सना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास सक्षम करणे हा आहे. कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क, मीशो, नवी, मारुती नेक्सा, स्निच, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि तनिष्क यांसारख्या ब्रँडसाठी चालवलेल्या मोहिमेत असे दिसून आले की, लोक जाहिराती आणि रील्स पाहून उत्पादने खरेदी करतात. निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, रील्स पाहिल्यानंतर लोक ब्रँडचे अनुसरण करतात किंवा अगदी खरेदीही करतात. भारतातील सर्वेक्षण केलेल्या 82 टक्के लोकांनी रील्स पाहिल्यानंतर व्यवसायाचा पाठपुरावा केल्याचे सांगितले आणि 77 टक्के लोकांनी रील्स पाहिल्यानंतर उत्पादन किंवा सेवा खरेदी केल्याचे सांगितले. (हेही वाचा: कर्नाटक सरकार सोबतच्या MoU नंतर Bengaluru Airport जवळ Foxconn ने खरेदी केली 300 एकर जमीन)
Facebook, Instagram Reels: 77% of People Surveyed in India Have Purchased a Product or a Service After Watching Reels, Finds Meta Study#Facebook #Instagram #InstagramReels #Meta https://t.co/q9L7L9opsJ
— LatestLY (@latestly) May 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)