शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट बँकेला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर तात्काळ नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंग करणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. बँकेला त्यांच्या आयटी (IT) प्रणालीचे सर्वसमावेशक सिस्टम ऑडिट करण्यासाठी आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही कारवाई बँकेत आढळलेल्या काही मटेरीअल पर्यवेक्षकीय समस्यांवर आधारित आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडद्वारे नवीन ग्राहकांचे ऑनबोर्डिंग हे, आयटी ऑडिटर्सच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर आरबीआयद्वारे मंजूर केलेल्या विशिष्ट परवानगीच्या अधीन असेल, असे सेंट्रल बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.
Reserve Bank of India stops Paytm Payments Bank from onboarding new customers pic.twitter.com/wOemAsw21a
— ANI (@ANI) March 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)