Stray Dogs Maul Woman To Death: पंजाबच्या कपूरथला येथील सुलतानपूर लोधी परिसरात एक अत्यंत वेदनादायी घटना घडली आहे. येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका परप्रांतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर कपूरथला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, जिथे तिचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी सांगितले की, रामपरी देवी या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या असता, 20 भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी रामपरी देवीचे अक्षरशः तुकडे केले. गावकऱ्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका मुलाचाही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केले असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे, असे सांगितले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर कबीरपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मृतदेह सुलतानपूर लोधीच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे. (हेही वाचा: Coaching Center Operator Beats Student: कोचिंग सेंटरमध्ये हसणे विद्यार्थ्यांला पडले महागात; संचालकाने केली अमानुषपणे बेदम मारहाण, पहा धक्कादायक व्हिडिओ)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)