Prayagraj Maha Kumbh Stampede: प्रयागराज मधील कुंभमेळ्यात आज झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू; 25 जणांची ओळख पटली- DIG Mahakumbh, Vaibhav Krishna यांची माहिती
प्रयागराज मधील कुंभमेळ्यात आज झालेल्या चेंगरा चेंगरीच्या घटनेत 60 जण जखमी आहेत तर 30 जण मृत पावले आहेत.
आज 'मौनी अमावस्या' निमित्त शाही स्नान करण्याकरिता भाविकांंची मोठी गर्दी उसळली होती. यामध्ये त्रिवेणी संगम भागात चेंगराचेंगरी झाली आहे. पवित्र कुंभमेळ्याच्या धामधुमीमध्ये या दुर्देवी घटनेने गालबोट लागलं आहे. दरम्यान DIG Mahakumbh, Vaibhav Krishna यांच्या माहितीनुसार, 30 जणांचा यामध्ये जीव गेला आहे. त्यापैकी 25 जणांची ओळख पटली आहे. आज दुपारी 1-2 दरम्यान झालेल्या या दुर्देवी घटनेत अद्याप 5 जणांची ओळख पटलेली नाही. अजून 60 जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या कुंभमेळ्यातील यंदाच्या शाहीस्नानाच्या 6 तारखा.
कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत 30 मृत
Prayagraj, UP: 30 people have lost their lives in the Maha Kumbh stampede that took place between 1-2 AM. 25 people have been identified and the identification of the remaining 5 is being done: DIG Mahakumbh, Vaibhav Krishna pic.twitter.com/9CqHORT0wt
— ANI (@ANI) January 29, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 07:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

