पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (3 डिसेंबर) राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की "आजचा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. 'सबका साथ, सबका विकास' या कल्पनेचा आज विजय झाला आहे."

या पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की "आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला, वंचितांच्या प्राधान्याच्या विचाराचा विजय झाला, देशाच्या विकासासाठी राज्यांच्या विकासाच्या विचाराचा विजय झाला." नवी दिल्ली या भाजप कार्यालयात आयोजित विजयीसभेमध्ये पंतप्रधान बोलत होते.  (हेही वाचा - PM Narendra Modi On BJP Win: भारतातील जनतेचा विश्वास फक्त सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर, 3 राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले मतदारांचे आधार)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)