पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेला, व्हाईट हाऊसला भेट देण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात व्हाईट हाऊसला भेट देतील. ट्रम्प यांनी म्हटले, ‘माझे सोमवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांच्याशी विस्ताराने बोलणे झाले. ते पुढच्या महिन्यात व्हाईट हाऊसला भेट देणार आहेत. या भेटीच्या माध्यमातून भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक, संरक्षण, आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरू शकते. अधिकृत कार्यक्रम आणि चर्चेच्या मुद्द्यांची माहिती अद्याप उपलब्ध नाही. पहिल्या कार्यकाळात अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचा शेवटचा विदेश दौरा भारताचा होता. ट्रम्प आणि मोदी यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या दोघांनी सप्टेंबर 2019 मध्ये ह्यूस्टन आणि फेब्रुवारी 2020 मध्ये अहमदाबादमध्ये दोन वेगवेगळ्या रॅलींमध्ये हजारो लोकांना संबोधित केले होते. (हेही वाचा: Birthright Citizenship Order: अमेरिकेच्या न्यायालयाकडून Donald Trump यांचा झटका; जन्मसिद्ध नागरिकत्व संपवण्याच्या आदेशाला दिली स्थगिती)
PM Narendra Modi Likely To Visit White House:
Donald Trump said Indian PM Narendra Modi will probably come to the White House in February https://t.co/kQQB0oSepn
— Bloomberg (@business) January 28, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)