पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांना श्रद्धांजली वाहिली. कमला पुजारी यांचे शनिवारी किडनी संबंधित आजाराने निधन झाले. कमला पुजारी या 74 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले व दोन मुली आहेत. किडनीशी संबंधित आजारामुळे कमला पुजारी यांना दोन दिवसांपूर्वी कटक येथील एससीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्यावर चार सदस्यीय वैद्यकीय पथक उपचार करत होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जयपूर जिल्हा रुग्णालयातून कटक, ओडिशात नेण्यात आले.
पाहा पोस्ट -
Padma Shri Awardee Kamala Pujari passes away at 74
Read @ANI Story | https://t.co/5Os4q55IhI#KamalaPujari #PadmaShri pic.twitter.com/BsJWdi0AST
— ANI Digital (@ani_digital) July 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)