लवकरच तुम्ही लाभार्थी न जोडता एका बँक खात्यातून दुसर्या बँक खात्यात 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकाल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करणे सोपे आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी त्वरित पेमेंट सेवा (IMPS) सरलीकृत केली आहे. एनपीसीआयनुसार, जर तुम्हाला एखाद्याला पैसे पाठवायचे असतील तर फक्त त्याचा मोबाईल नंबर आणि बँक खात्यावरील नाव वापरून तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवू शकाल. यासाठी पूर्वी इतर अनेक माहिती भरायला लागत होती- जसे की खाते क्रमांक आणि IFCS कोड इ. आता ही प्रक्रिया अतेशय सोपी होणार आहे. हा नवीन नियम लवकरच लागू होईल. (हेही वाचा: Zomato Food Delivery In Train: आता ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करणे होणार सोपे; IRCTC ने फूड डिलिव्हरीसाठी झोमॅटोसोबत केला करार)
New #IMPS money transfer rule: Soon, send up to Rs 5 lakh with mobile no., bank name; no need to add beneficiary, account, #IFSChttps://t.co/OXDXCaEKhb
— Economic Times (@EconomicTimes) October 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)