New Government Formation: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. तर, इंडिया युतीला 243 जागा मिळाल्या आहेत. यावेळी एकहाती बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला यश आलेले नाही. मात्र, टीडीपी आणि जेडीयूसारख्या पक्षांमुळे मोदी सरकारने तिसऱ्यांदा सरकार स्थापनेकडे वाटचाल केली आहे. आजच्या एनडीएच्या बैठकीमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनीही भाजपला पाठिंबा देणारी पत्रे सादर केली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आजच सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. यासाठी सर्व एनडीए पक्षांचे नेते संध्याकाळी 7.45 वाजता राष्ट्रपती भवनात पोहोचतील. लोकसभा निवडणुकीनंतरच्या एनडीएच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे मोदींनी राजीनामा दिल्यानंतर आणि मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा विसर्जित केली.
एनडीएची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी तासभर चालली. यामध्ये 21 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यामध्ये जेडीयु नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, सुदेश महतो, आरएलडीचे जयंत चौधरी, जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिराग पासवान, अनुप्रिया पटेल, जीतनराम मांझी यांचा समावेश आहे. एनडीएच्या नेत्यांनी मांडलेल्या प्रस्तावात एनडीएच्या नेत्यांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची गट नेता म्हणून निवड केली आहे. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मित्रपक्षांसोबत सरकार स्थापनेबाबत एकत्र चर्चा करतील. (हेही वाचा: World Leaders Congratulate Narendra Modi: आतापर्यंत 50 हून अधिक जागतिक नेत्यांनी नरेंद्र मोदींचे केले अभिनंदन; 8 जूनला घेऊ शकतात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपत)
Breaking News: According to sources, Nitish Kumar and Chandrababu Naidu are submitting letters of support. They are claiming to form the government soon.#BreakingNews #NDA #BJP #NitishKumar pic.twitter.com/s86zaW45fV
— Zee News English (@ZeeNewsEnglish) June 5, 2024
TDP president N Chandrababu Naidu, JD(U) leader and Bihar chief minister Nitish Kumar, Shiv Sena leader and Maharashtra chief minister Eknath Shinde and LJP (Ram Vilas) leader Chirag Paswan were among those who were present at the meeting chaired by Modi. Senior BJP leaders were… pic.twitter.com/yv311ELA7G
— JioNews (@JioNews) June 5, 2024
#WATCH | NDA leaders held a meeting today at 7, LKM, the residence of Prime Minister Narendra Modi, in Delhi pic.twitter.com/xuxjDjYKaI
— ANI (@ANI) June 5, 2024
NDA leaders unanimously elect Narendra Modi as their leader in the proposal passed by the leaders of the NDA in Delhi. pic.twitter.com/dJat3JR9KI
— ANI (@ANI) June 5, 2024
After the meeting with NDA MPs on 7th June. The allies of the NDA will meet President Droupadi Murmu. Defence Minister Rajnath Singh, Union HM Amit Shah and BJP president JP Nadda will together discuss the formation of the government with the allies: Sources
— ANI (@ANI) June 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)