Mumbai-Delhi School Bomb Threat: मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा भागातील रायन ग्लोबल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी शाळेला ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती. यानंतर तातडीने सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आणि परिसराची तपासणी सुरू झाली. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोलीस आणि स्फोटके शोधणारे कर्मचारी संकुलाच्या प्रत्येक कोपऱ्यात तपास करत आहेत. ईमेलमध्ये अफझल गँगचे नाव देण्यात आले आहे. आज सकाळीच बातमी अली होती की, राजपाल यादव, रेमो डिसूझा, सुगंधा मिश्रा आणि कपिल शर्मा यांना पाकिस्तानकडून धमक्या मिळाल्या आहेत, त्यानंतर आता शाळेला ही धमकी देण्यात आली आहे. बॉम्ब धमकी प्रकरणामध्ये कधी कधी तथ्ये नसले तरी, शाळांमध्ये अशा धमक्या अत्यंत गंभीरपणे घेतल्या जातात, कारण त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जीवन धोक्यात येऊ शकते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की या धमकीचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
दुसरीकडे, गुरुवारी दिल्लीतीलही अनेक शाळांना बंदी घातलेल्या खलिस्तान समर्थक गट, शीख फॉर जस्टिस (SFJ) कडून धमकीचे ईमेल प्राप्त झाले आणि त्यांना प्रजासत्ताक दिनाचे उत्सव स्थगित करण्यास सांगितले. ईमेलमध्ये शाळांना ‘हिंसा आणि राज्य सूडाचा उच्च धोका’, अशी धमकी दिली आहे आणि शाळांना प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात सहभाग निलंबित करण्याची सूचना दिली आहे. (हेही वाचा: Kota Student Suicide: राजस्थानच्या कोटा येथे एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; गेल्या 22 दिवसात घडल्या 6 घटना)
Mumbai-Delhi School Bomb Threat:
After Mumbai Bomb Threat, Several Schools In Delhi Receive Mails To Cancel Republic Day Celebrations#Delhi #Delhibombthreat #ABPLivehttps://t.co/lE5IX9fBlM
— ABP LIVE (@abplive) January 23, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)