अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्री हायड्रोजनचे सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक दोन रस्त्याच्या मध्ये असलेल्या गॅपमध्ये कोसळून अपघात झाला आहे. यातल्या एका सिलेंडरचा स्फोट होवून आग लागली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आता मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सर्व्हिस रोडवरून हळूहळू सुरू करण्यात आली आहे. मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात रात्री 2-3 च्या सुमारास झाला आहे.
मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान मुंबईच्या दिशेनं हायड्रोजनचे सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक दोन रस्त्याच्या मध्ये असलेल्या गॅपमध्ये कोसळला. ट्रक उलटल्यानंतर यामधले हायड्रोजनचे सिलेंडर रस्त्यावर पडले. pic.twitter.com/oo0MsQ81LD
— AIR News Pune (@airnews_pune) August 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)