Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) राजगड जिल्ह्यातील (Rajgarh District) शाहपुरा गावात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सुनेला तिच्या सासरच्यांनी अत्यंत क्रूर वागणूक दिली. प्राप्त माहितीनुसार, महिलेचा विनयभंग झाला. परंतु, सासरच्या मंडळींनी तिला मदत करण्याऐवजी तिच्यावर अत्याचार केला. वास्तविक, गावातील एक तरुण वाफेचे यंत्र मागवण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरी आला आणि तिचा विनयभंग करू लागला. यावेळी घरात उपस्थित असलेल्या पीडितेच्या जावेने हा संपूर्ण प्रकार पाहिला. तिला पाहताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. मात्र सासरच्या लोकांनी आरोपीला शिक्षा देण्याऐवजी सुनेवर क्रूरपणे अत्याचार केले.
विनयभंगाच्या घटनेनंतर सुनेलाचं ठरवण्यात आलं दोषी -
पीडित महिलेच्या सासरच्यांनी विनयभंगाच्या घटनेत सुनेला दोष देण्यास सुरुवात केली. यानंतर सासरच्यांनी तिला मारहाण केली. सासू, सासरे, पती आणि जावेने मिळून तिचे कपडे काढले आणि तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तिच्या सासूने तिचा प्रायव्हेट पार्ट आणि मांडी गरम लोखंडाने जाळण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, सासरच्यांनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली. त्यांनी तिला नग्न करून रात्रभर मारहाण केली. दुसऱ्या दिवशी बेशुद्ध अवस्थेत पती व सासरच्यांनी तिला मोटारसायकलवर बसवून तिच्या माहेरच्या घराजवळ फेकून दिले. (हेही वाचा -Madhya Pradesh Shocker: अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेने पतीच्या सहकर्मचाऱ्याची केली हत्या)
स्थानिकांनी पीडितेच्या वडिलांनी दिली माहिती -
या सर्व प्रकारानंतर स्थानिक लोकांनी पीडितेच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली. शहापुरा गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या मुलीची अवस्था पाहून पीडितेच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या पोलिस सध्या पीडित महिलेचे समुपदेशन करत आहेत. (हेही वाचा -Couple’s Dispute Over Baby Name : मुलाच्या नावाचा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला; 3 वर्ष सुरू असलेली केस कर्नाटक कोर्टाने अखेर लावली निकाली
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल -
स्थानिक पोलिसांनी सासू, सासरे, पती, वहिनी आणि मुलासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी पीडितेवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. आरोपींविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.