जम्मू येथील गंगियाल परिसरात असलेल्या एका कारखान्यास भीषण आग लागली आहे. आगीने रौद्र रुप धारण केले आहे. आगीच्या ज्वाळा आकाशाकडे झेप घेत आहेत. तर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पाहायला मिळतो आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे भडकली याबाबत अत्याप पुरेसा तपशील पुढे आला नाही. वृत्तसंस्था एएनआयने या आगीचा व्हिडिओ एक्स हँडलवर पोस्ट केला आहे. (हेही वाचा, Madhya Pradesh Fire: मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे प्लास्टिकच्या कारखान्याला आग, कोणतीही जीवितहानी नाही)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)