विवाहित पुरुषाची प्रेयसी किंवा पुरुषाचे विवाहबाह्य शारीरिक संबंध असणारी महिला अशा पुरुषावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 498अ अंतर्गत खटला दाखल करू शकत नाही. केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच हे निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती के बाबू यांनी नमूद केले की, ‘नातेवाईक’ हा शब्द विवाहित पुरुषाच्या गर्लफ्रेंडसाठी कलम 498A अंतर्गत लागू केला जाऊ शकत नाही. या कायद्यांतर्गत केवळ पत्नीच पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध क्रूरतेसाठी गुन्हा दाखल करू शकते. जर एखाद्या पुरुषाचे त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न झाले नसेल तर अशी महिला त्या पुरुषाविरुद्ध कलम 498अ लागू करत शकत नाही. (हेही वाचा: Government Official and Bigamy: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पुनर्विवाहाबाबत उच्च न्यायालयाची महत्वाची टिपण्णी; म्हणाले- 'पहिली पत्नी असताना दुसरे लग्न...')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)