Lok Sabha Election Results 2024: लोकसभा निवडणुकीच्या 542 जागांवर मतमोजणी सुरू आहे. सध्याच्या निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 300 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी 225 जागांवर आघाडीवर आहे. ट्रेंडमध्ये जरी सध्या एनडीए बहुमत मिळाले असल्याचे दिसत असले तरी, इंडिया आघाडी देखील कठीण स्पर्धा देत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये यूपी, महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये भाजपला सर्वात मोठा फटका बसताना दिसत आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए विजयाची हॅट्ट्रिक करेल का? इंडिया आघाडी भाजपचा विजयरथ रोखू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट होतील. (हेही वाचा: Lok Sabha Election Result 2024: रावेर मतदारसंघात EVM मध्ये छेडछाड झाल्याचा Shriram Patil यांचा आरोप; 1 महिन्यापासून मशीनची बॅटरी 99 टक्केच)
पहा पोस्ट-
As per ECI trends, BJP-led NDA leading on 300 seats. INDIA alliance leading on 225 seats
#LokSabhaElections2024 pic.twitter.com/WQ4pSCbx5L
— ANI (@ANI) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)