Lok Sabha Election Result 2024: रावेर मतदारसंघात EVM मध्ये छेडछाड झाल्याचा Shriram Patil यांचा आरोप; 1 महिन्यापासून मशीनची बॅटरी 99 टक्केच

श्रीराम पाटील म्हणतात, 'रावेर मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली तेव्हा आमच्या लक्षात आले की, ईव्हीएमची बॅटरी टक्केवारी 99% आहे. जर त्या ईव्हीएमवर गेल्या 1 महिन्यापासून मतदान होत असेल तर त्याची बॅटरी 99% कशी असू शकते?'

Lok Sabha Election Result 2024: रावेर मतदारसंघात EVM मध्ये छेडछाड झाल्याचा Shriram Patil यांचा आरोप; 1 महिन्यापासून मशीनची बॅटरी 99 टक्केच
Photo Credit - X

Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादी-एससीपीचे उमेदवार श्रीराम पाटील म्हणतात, 'रावेर मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली तेव्हा आमच्या लक्षात आले की, ईव्हीएमची बॅटरी टक्केवारी 99% आहे. जर त्या ईव्हीएमवर गेल्या 1 महिन्यापासून मतदान होत असेल तर त्याची बॅटरी 99% कशी असू शकते? ज्या ईव्हीएममध्ये बॅटरीची टक्केवारी कमी आहे तेथे भाजपला कमी मते आहेत, तर 99% बॅटरी असलेल्या या ईव्हीएममध्ये भाजपला सर्वाधिक मते आहेत. शेवटपर्यंत 99% बॅटरी असलेल्या मशिनमध्ये मोजणी करणे आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही ते थांबवले आहे. या संदर्भात आम्हाला निवडणूक आयोगाला पत्र लिहायचे आहे, परंतु आम्हाला येथे मोबाईल फोन आणण्याची परवानगी नव्हती.' काही काळासाठी इथे मतमोजणी थांबवण्यात आली होती, मात्र आता ती पुन्हा सुरु झाली आहे. (हेही वाचा: Sanjay Raut on Narendra Modi: 'नरेंद्र मोदी यांचा निरोप समारंभ पूर्ण झाला', संजय राऊत यांना इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल खात्री)

पहा पोस्ट- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).