Lok Sabha Election 2024 Results: देशभरात लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे संपल्यानंतर आज मतमोजणी सुरू आहे. अशात मध्य प्रदेशातील इंदूरची जागा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. या ठिकाणी नोटा (NOTA) ला आतापर्यंत सर्वाधिक मते मिळाली आहेत. यासह इंदूरमधील 'नोटा'ने बिहारमधील गोपालगंजचा पूर्वीचा विक्रम मोडला आहे. इंदूरमध्ये आतापर्यंत नोटाला 1,96,903 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे यावेळी इंदूरने देशातील सर्वाधिक नोटाचा विक्रम केला आहे. याआधी बिहारच्या गोपालगंज जागेवर 2019 च्या निवडणुकीत 51,660 नोटा मते मिळाली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सप्टेंबर 2013 मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये 'NOTA' बटण समाविष्ट करण्यात आले होते. इंदूर जागेबाबत बोलायचे झाल्यास, इथे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकर लालवानी आघाडीवर आहेत. इंदूरमधील काँग्रेसचे घोषित उमेदवार अक्षय कांती बम यांनी, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेला, 29 एप्रिल रोजी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. त्यानंतर लगेचच अक्षय कांती बम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे या जागेच्या 72 वर्षांच्या इतिहासात काँग्रेस प्रथमच निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली. यानंतर काँग्रेसने स्थानिक मतदारांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (EVM) 'नोटा' बटण दाबून भाजपला धडा शिकवण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: Lok Sabha Election Result 2024: रावेर मतदारसंघात EVM मध्ये छेडछाड झाल्याचा Shriram Patil यांचा आरोप; 1 महिन्यापासून मशीनची बॅटरी 99 टक्केच)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)