एचडीएफसी बँकेच्या ऑनलाइन बैठकीत टार्गेट पूर्ण करण्यावरून वरिष्ठांनी आपल्या कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष पुष्पल रॉय आपल्या कर्मचार्‍यांना फटकारतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोमी चक्रवर्ती नावाच्या युजरने लिंक्डइन या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. बंगाली भाषेतील व्हिडिओमध्ये, रॉय त्याच्या अधीनस्थांना त्यांच्या कामाची स्थिती आणि ध्येयांचा आढावा घेताना टोमणे मारताना दिसत आहे, तसेच रॉय आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत अतिशय उद्धटपणे बोलतांना दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, एचडीएफसी बँकेने कठोर कारवाई करत वरिष्ठ उपाध्यक्ष पुष्पल रॉय यांना निलंबित केले आहे. एचडीएफसी बँकेने एका निवेदनात म्हटले आहे, प्रकरणाच्या प्राथमिक तपासाच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. (हेही वाचा: Woman Beating Man Video: महिलेने पुरुषाला बसमध्ये बदडले, बसमध्ये छेडछाड केल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)