Woman Beating Man Video: महिलेने पुरुषाला बसमध्ये बदडले, बसमध्ये छेडछाड केल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल
Woman Beating Man Video | (Image Credit -Twitter)

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. हा व्हिडिओ कर्नटकमधील (Karnataka) Bus) बसमधला असल्याचे सांगितले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडोची पुष्टी करत नाही. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक महिला धावत्या बसमध्ये पुरुषाला बदडते (Woman Beats Man) आहे. आरोप आहे की, सदर पुरुषाने महिलेशी छेडछाड (Teasing) केली. तिला किळसवाणे पद्धतीने स्पर्ष केला. महिलेने परुषाला आगोदर सूचना केली होती. मात्र, सूचना करुनही त्याने तिच्या सूचनेकडे दूर्लक्ष केले.

बस सुरु असताना सदर पुरुषाने पुन्हा एकदा त्या महलिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा सांगूनही हा व्यक्ती ऐकत नाही हे पाहून महिलेचा संताप अनावर झाला. तिने थेट त्याची कॉलर पकडली आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली, असे सांगितले जात आहे. दरम्यान, व्हिडिओचा आवाज येत नसल्याने नेमके त्यांच्यातील संवाद लक्षात येत नाहीत. बसमधील लोक हा सगळा प्रकार पाहात आहेत. त्यातीलच एकाने कोणीतरी पुरुषाला बदडत असलेल्या महिलेचा व्हिडिओ बनवीला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, KSRTC Bus Masturbation Video: महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन केल्याचा आरोप असलेल्या सावद शाहचे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर करण्यात आलं हिरोप्रमाणे स्वागत, See Pic)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विरवर @HateDetectors या हँडलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही घटना कर्नाटक राज्यातील मंड्या येथील केआरपेटे बसस्थानकावर घडली. सदर परुषाने महिलेची छेड काढली. त्यानंतर संतप्त महिलेने परुषाला बदडले. महिला लोकल बसमध्ये प्रवास करत होती. अज्ञात व्यक्ती तिची छेड काढत होती. तो तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. तिने एकदोन वेळा तसे न करण्यास सांगूनही आरोपीचे कृत्य सुरुच होते. परिणामी महिलेने त्याला कथीतपणे हिसका दाखवला.

ट्विट

दरम्यान, व्हिडिओत असेही पाहायला मिळते की, महिला तिच्यासोबत झालेल्या चुकीच्या प्रकाराबद्दल स्पष्ट भूमिका घेते आहे. परंतू, बसमधील प्रवासी शांतपणे हा सर्व तमाशा पाहात आहेत. ना ते त्या पुरुषाला वाचवत आहेत. ना ते त्या महिलेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे नेमकी चूक कोणाची, याबाबत नेटीझन्समध्ये संभ्रम आहे.