केरळमध्ये सततच्या चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. राज्यातील पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 8 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी कोट्टायममध्ये 13 आणि इडुक्कीमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पठाणमथिट्टाचा डोंगराळ भाग पुरामुळे अधिक प्रभावित झाला आहे.  हवामान खात्याने रविवारीही मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यभरात 105 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत आणि आणखी शिबिरे सुरू करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)