कर्नाटक राज्यातील अटीबेले येथील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत मोठी हानी झाली. आतापर्यंत 12 जणांनी या घटनेत प्राण गमावले आहेत. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यानुकसानीची काही दृश्ये व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आली आहेत. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या 'X' हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यातून या नुकसानिचा अंदाज येतो. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दुर्घटना घडलेल्या ठिकाणी भेट देणार आहेत. या वेळी ते स्थानिक नागरिकांशी चर्चा करतील. तसेच, नुकसानीचा आढावाही घेणार असल्याचे समजते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)