कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र यांची पक्षाच्या राज्य युनिटच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी भाजप नेते नलिनकुमार कटील यांची जागा घेतली आहे. याआधी 2020 मध्ये, विजयेंद्र यांना भाजपच्या कर्नाटक युनिटचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी शुक्रवारी (10 नोव्हेंबर) जारी केलेल्या निवेदनानुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आमदार विजयेंद्र येडियुरप्पा यांची कर्नाटक भाजप अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 47 वर्षीय बीवाय विजयेंद्र यांना त्यांचे वडील बीएस येडियुरप्पा यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते. भाजपमध्ये एक कुशल संघटनात्मक नेता म्हणूनही विजयेंद्र यांच्याकडे पाहिले जाते. (हेही वाचा: KTR Rao Accident Video: तेलंगणा मध्ये प्रचार रॅलीत वाहनावरील रेलिंग तुटलं Telangana Minister, BRS नेते KTR Rao खाली कोसळले (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)