राजस्थानमधील जयपूर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका मानसिक आजारी महिलेला रस्त्याच्या मधोमध सार्वजनिकरित्या मारहाण करण्यात आली आहे. सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. गर्दीचा एक भाग रस्त्याच्या मधोमध महिलेला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. जमावाने महिलेच्या घरात घुसून तिचे केस आणि कपडे ओढून तिला बाहेर काढले. त्यानंतर लोकांनी तिला बेदम मारहाण केली.

प्रकरणाची माहिती मिळताच मालपुरा गेट पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र पोलीस आल्यानंतरही आरोपींनी महिलेला मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर पोलिसांनी कशीतरी या महिलेची सुटका करून तिला रुग्णालयात नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 20 जुलैची आहेम ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगत, घरात धर्मविरोधी गोष्टी लिहिल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. (हेही वाचा: देव तारी त्याला कोण मारी! मुलं लिफ्टमधून बाहेर पडताच 10व्या मजल्यावरून खाली कोसळली लिफ्ट; पहा अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)