Indian Navy Veterans Released By Qatar: अलीकडेच, भारत सरकारने कतार तुरुंगात बंद असलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका केली आहे, त्यापैकी सात सैनिक भारतात परतले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. ज्यावेळी हे सैनिक भारतात परतले तेव्हा भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता की, या नौसैनिकांच्या रिलीजमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा हात आहे. त्यानंतर अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले होते. आता शाहरुख खानच्या टीमने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कतारमधून भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात शाहरुख खानच्या कथित भूमिकेचे दावे निराधार आहेत. या प्रकरणात शाहरुख खानचा सहभाग स्पष्टपणे नाकारतो.’ शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिने इंस्टाग्रामवर एक स्टेटमेंट शेअर केले आहे. अशाप्रकारे त्यांनी नौसैनिकांच्या सुटकेमध्ये शाहरुख खानचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (हेही वाचा: UPI RuPay Card Service in Abu Dhabi: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर; अबुधाबीमध्ये सुरु केली युपीआय रुपे कार्ड सेवा)
Shah Rukh Khan's team denies actor's role in release of Indian Navy veterans from Qatar
Read @ANI Story | https://t.co/C2JTx1CZbA#SRK #ShahRukhKhan #Qatar pic.twitter.com/W0PMDUgJaR
— ANI Digital (@ani_digital) February 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)