UPI RuPay Card Service in Abu Dhabi: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (13 फेब्रुवारी) दोन दिवसांच्या दौऱ्यावर संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पोहोचले. यादरम्यान ते द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी आखाती देशातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील. अबुधाबी येथे पंतप्रधान मोदींचे आगमन होताच त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची अबू धाबी येथे बैठक झाली. यावेळी दोघांच्या उपस्थितीत भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली. यानंतर पीएम मोदी आणि यूएईचे अध्यक्ष यांनी अबुधाबीमध्ये युपीआय रुपे कार्ड सेवा सुरू केली. रूपे ही एक भारतीय बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा आणि पेमेंट सेवा प्रणाली आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस, सामान्यतः युपीआय म्हणून ओळखले जाते, ही एक भारतीय इन्स्टंट पेमेंट सिस्टम आहे.

पहा व्हिडिओ- 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)