राजस्थानच्या टोंकमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीषण पाणी साचल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये मोटारसायकल जलमय रस्त्यांवर तरंगताना दिसत आहेत. आज सकाळपासून टोंकमध्ये पाऊस पडत आहे. बिसलपूर धरणाच्या कॅटमेंच परिसरात पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत जयपूर, कोटा, भरतपूर, उदयपूर, बिकानेर आणि जोधपूर विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पाहा पोस्ट -
Tonk, Rajasthan: Heavy rainfall causes significant water logging in the old Tonk area. Roads have transformed into rivers, with motorcycles seen floating in it pic.twitter.com/dG75XJxKjE
— IANS (@ians_india) July 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)