22 जानेवारीला दुपारी 12.30 ते 1 च्या दरम्यान श्रीराम मंदिरात रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठीत केली जाणार आहे. हा मंगलमय सोहळा पाहता यावा यासाठी केंद्र सरकार कर्मचार्‍यांकडून हाफ डे मागण्यात आला होता. कर्मचार्‍यांची ही मागणी अखेर मान्य झाली आहे. 22 जानेवारीला दुपारी 2.30 पर्यंत सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान देशभर बंद राहणार आहेत. Ayodhya Ram Mandir Inauguration: उत्तर प्रदेश पाठोपाठ गोवा मध्येही 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)