Ram Mandir | Twitter

अयोद्धेच्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी (Ayodhya Ram Mandir Inauguration) देशभर सध्या हिंदू आणि रामभक्त उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला रामजन्मभूमी मंदिरामध्ये भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी उत्तर प्रदेश पाठोपाठा गोवा सरकार (Goa Government) कडून 22 जानेवारीला शासकीय सुट्टी (Holiday) जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी महाराष्ट्रातही शासकीय सुट्टी असावी अशी मागणी भाजपा नेत्यांकडून जोर धरत आहे. मंगलप्रभात लोढा, राम कदम, अतुल भातखळकर यांनी सरकारकडे त्याबाबत पत्र लिहून मागणी केली आहे. Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: अयोद्धेच्या राम मंदिर उद्धाटन दिनी 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; मुंबईतील अजून एका भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र! 

गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर केली असल्याने त्या दिवशी शाळा आणि सरकारी कार्यालयं बंद राहणार आहेत. प्रमोद सावंतानी 22 जानेवारीला राम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस लोकांना दिवाळी प्रमाणे साजरा करता यावा म्हणून आपण शासकीय सुट्टी 22 जानेवारीला जाहीर करत असल्याचं म्हटलं आहे. Lal Krishna Advani अयोद्धेमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला येणार - विश्व हिंदू परिषदेचा दावा .

महाराष्ट्र सरकार कडून अद्याप 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही पण राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त लोकांना आनंदाचा शिधा मिळणार असल्याची घोषणा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली आहे. रामभक्तांना अयोद्धेच्या राम मंदिरात जाता यावं म्हणून आता इंडिगो कडून मुंबई-अयोद्धा थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. विशेष रेल्वे देखील चालवली जात आहे.

दरम्यान मुंबई मध्ये अनेक उद्योगपती, बॉलिवूड कलाकार, ज्येष्ठ गायक, कलावंत यांना या राममंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. 22 जानेवारीला या मुंबई-अयोद्धा विमानाचं भाडं 20 हजारांच्या पार गेलं आहे.