GT Mall To Shut For 7 Days: बंगळुरूच्या जीटी वर्ल्ड मॉलमध्ये धोतर नेसून आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवल्याची धक्कादायक घटना काल समोर आली. या व्यक्तीला त्याने धोतर नेसले आहे म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. या घटनेनंतर मॉलवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, कर्नाटक सरकारने बेंगळुरूमधील जीटी वर्ल्ड मॉल आठवडाभर बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी, भारतीय न्यायिक संहिता (BNS) च्या कलमाअंतर्गत मॉल मालक आणि सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अहवालानुसार, ही व्यक्ती आपल्या मुलाला भेटण्यासाठी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातून बेंगळुरूला आली होती. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी मुलगा व वडील मॉलमध्ये आले. चित्रपटाची तिकिटे असूनही केवळ धोतर नेसले आहे म्हणून, यांना प्रवेश नाकारला. मॉलचे धोरण धोतर परिधान केलेल्या व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित करते, असे सुरक्षा कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानंतर आता या मॉलवर कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा: Everybody Must Learn Kannada: कर्नाटकमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड शिकायलाच हवे, मंत्री रामलिंग रेड्डी यांचे वक्तव्य)
पहा पोस्ट-
#BREAKING #Karnataka minister B Suresh announces closure of GT mall for 7 days for not allowing elderly man to enter mall wearing a dhoti
Issue raised in the assembly!
Byrathi Suresh, Urban Development Minister: I just spoke to one of our former BBMP Commissioners. The… https://t.co/hmZQ0j7wwa pic.twitter.com/tA3qVhhNCb
— Nabila Jamal (@nabilajamal_) July 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)