CSK vs PBKS 49th Match: आयपीएल 2025 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात चेन्नईचा बालेकिल्ला असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला आहे. चेपॉकवरील चेन्नईचा हा सलग पाचवा पराभव आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने 18.4 षटकात लक्ष्य गाठले. या पराभवासह, चेन्नई आयपीएल 2025 मधून बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे. जर अपडेटेड पॉइंट टेबल बद्दल बोलायचे झाले तर पंजाबने 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर सीएसके दहाव्या स्थानावर आहे.
IPL 2025 POINTS TABLE. 📈
- RCB with 14 Points.
- PBKS with 13 Points.
- CSK eliminated. pic.twitter.com/e3G0gtBOuR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)