वस्तू आणि सेवा कराचा भरणा न करणे आणि जीएसटी नियमांचे पालन न करणे याबाबत देशातील जीएसटी प्राधिकरणाकडून कंपन्यांना दररोज जीएसटी नोटिसा पाठवल्या जात आहेत. आता यातील पुढील नावे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि झोमॅटो यांची आहेत. अहवालानुसार, डीजीजीआयने दोन्ही कंपन्यांना 500-500 कोटी रुपयांची जीएसती डिमांड नोटीस पाठवली आहे. दोन्ही कंपन्यांनी फूड डिलिव्हरीवर आकारलेले डिलिव्हरी शुल्क आता कर अधिकाऱ्यांनी कंपन्यांचे महसूल मानले आहे. जेव्हापासून कंपन्यांनी सेवा देण्यास सुरुवात केली, तेव्हपासून दोन्ही कंपन्यांनी घेतलेल्या डिलिव्हरी चार्जेसवर 18% जीएसती लादून 500-500 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने या प्रकरणी स्विगी-झोमॅटोला प्रश्न विचारला असता, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. (हेही वाचा: National Herald Case: सोनिया-राहुल गांधी यांना मोठा झटका! नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लाँड्रिंग चौकशीत ईडीने जप्त केली 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)