8 डिसेंबरला तमिळनाडू मध्ये व्हेलिंटन येथील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी सीडीएस बिपीन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर अपघातगस्त झाले. यामध्ये प्रवास करणारे सारे 13 जण मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान या हेलिकॉप्टर मधील ग्रुप कॅप्टन वरूण सिंह गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पण दुर्दैवाने आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भारतीयांनी वरूण सिंह पुन्हा ठीक व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती पण त्याला यश आले नाही. आज त्यांच्या निधनाचं वृत्त येताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी, सामान्य जनतेने शोक संदेश शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

IAF

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

अनुराग ठाकूर

राहुल गांधी

अतुल भातखळकर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)