Goa Election Results 2022: 19 जागा आणि 3 अपक्षांच्या पाठिंब्याने BJP गोव्यात सलग तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज- B L Santhosh

भारतीय जनता पक्षाने आपापल्या जागेवर आघाडीवर असलेल्या तीन अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा दर्शवल्याचा दावा केला आहे

Goa Election Results 2022: 19 जागा आणि 3 अपक्षांच्या पाठिंब्याने BJP गोव्यात सलग तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज- B L Santhosh
प्रमोद सावंत (Photo Credit: File Photo)

गोव्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे, परंतु राज्यात भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे निश्चित झाले आहे. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला विजय नोंदवताच गोव्याच्या राज्यपालांना भेटण्याची ऑफर दिली आहे. प्रमोद सावंत यांनी राज्यात आपले सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. गोव्यात भारतीय जनता पक्षाने 40 पैकी 19 जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. गोव्यात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.

भारतीय जनता पक्षाने आपापल्या जागेवर आघाडीवर असलेल्या तीन अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा दर्शवल्याचा दावा केला आहे. बिचोलीम मतदार संघातिल सर्वोच्च उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये, कोर्टल्लीमधेल पक्षाचे उमेदवार मॅन्युएल वाझ आणि कुर्तोरीमधुन पक्षाचे उमेदवार अलेक्सियो रेजिनाल्डो यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. अशाप्रकारे 19 जागा आणि 3 अपक्षांच्या पाठिंब्याने भाजप गोव्यात सलग तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज असल्याचे, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस (संघ) बी एल संतोष यांनी सांगितले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 05:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).